दिव्यांग मुलीचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण
मुंबई / रमेश औताडे
नागपूर येथील दिव्यांग मुलगी कु. मानवता ऊर्फ बेशिका रवीकांत डोंगरे हिला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार १६ फेब्रुवारी पासून हे आंदोलन सुरू झाले असून विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. “निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, जिंकलो नाही तर कधीच नाही,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनस्थळी मानवता हिने हातात आपल्या नातेवाईकाचा फोटो धरून न्यायाची मागणी केली. प्रशासनाने संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे पाहावे, अशी मागणी केली. आझाद मैदानावरील या उपोषणामुळे पुन्हा एकदा दिव्यांगांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *