विलिनिकरणाचा विषय थांबला, संपलेला नाही!!
राष्ट्रवादी या मासिकाच्या ताज्या अंकात संपादकीय लेख आला. त्यातून दादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्यात जुंपली आहे. “अजितदादांवर दबाव होता, कट-कारस्थानाने झाली, म्हणूनच त्यांना शरद पवारांची साथ सोडावी लागली आणि मग ती चूक सुधारण्याचा प्रयत्न अजितदादा अलिकडे करत होते. पण दुर्दैवाने त्या बाबतचा निर्णय़ घेण्या आधीच काळाने झडप घातली…” असा दावा रा.काँ.श.प. पक्षाचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी मासिकाच्या संपादकियात केला आहे. दादा बाहेर पडले हे शरद पवार पक्षाच्या दृष्टीने चुकीचे पाऊल असू शकले पण त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने ती अजिबात चूक नव्हती ! अजितदादांना जाणीवपूर्व, विचारपूर्वक महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेस सारख्या पक्षांची साथ संगत सोडण्याचे ठरवले होते. भाजपा सोबत जाऊन सरकारमध्ये सहभागी व्हायला हवे ही भूमिका अजितदादांनी सातत्याने शरद पवारांपुढेही मांडली होती. अनेकदा थोरल्या पवारांच्या सल्ल्याने दादा, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल सुनिल तटकरे आदि नेते हे अहमदाबादला व दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले. त्यांनी भाजपा नेत्यांबरोबर चर्चा केल्या. अजितदादांनी स्वतःच अनेकादा या बाबी सांगितल्या होत्या. तशा प्रकारे भजापा प्रणित रालोआ आघाडीत शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन जाऊया असे ते सांगतच होते. २०१४ ते २०२३ या कालावधीत किमान तीन वेळा तसे प्रयत्न अजितदादांनी केले. शेवटचा प्रयत्न तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अल्पकाळ फूट पाडणारा ठरला. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाची साथ सोडली. तेंव्हा शरद पवारांच्या सल्ल्याने दादांनी सुप्रिया सुळेंसह वर्षा बंगल्यावर देवेन्द्र फडणवीसांशी चर्चा केल्या होत्या. दिल्लीतील नेत्यांनाही त्याची कल्पना होती म्हणूनच अखेरीस २३ नोव्हेंबर २०१९ रोजी, फडणवीस व अजितदादांचा तो विख्यात पहाटेचा (खरेतर सकाळी सात साडेसात वाजताचा) शपथविधी राजभवनात पार पडला. फडणवीस मुख्यमंत्री म्हणून “पुन्हा परतले” होते. दादा आणखी एकदा उपमुख्यमंत्री बनले होते. दोघांच्याच त्या मंत्रीमंडळाच्या एक दोन बैठकाही झाल्या. पण विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी फडणवीस-दादांचे ते औट घटकेचे सरकार कोसळले. तेंव्हापासून दादा नाखुषीनेच शरद पवारांसोबत परतले होते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तसचे दोन्ही कँग्रेसच्या विरोधात लढून भजापा हाच विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला तेंव्हा भाजपा सरकारला बाहेरून समर्थन देण्याचा निर्णय शरद पवारांनी जाहीर केला होता. त्यानंतर २०१६ असेल, २०१७ असेल ते अगदी २०१९ चा सकाळचा शपथविधी असेल, त्यावेळेला देखील अजितदादा पवारांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन दोन पक्षांचे स्थिर सरकार बनवावे अशा प्रकारची होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठन २ मे २०२३ रोजी राष्ट्रवादीच्या भवितव्याचा विचार करण्यासाठीच सर्व आजी माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आदींचा मोठा मेळावा झाला. तिथे महायुती सोबत जायला हवे या अजितदादांच्या मताच्या बाजूने कार्यकर्त्यांचा कौल येत असताना,अचनक थोरल्या पवारांनी, “मीच पक्षाचा राजीनामा देतो”, अशी घोषणा केली आणि सारा पक्ष स्वतःभोवती गोळा केला. त्यानंतर अजित पावारंनाचा व्हीलन ठरवण्याची जी पावले राष्ट्रवादीच्या तेंव्हाच्या सर्व धुरीण नेत्यांनी टाकली, अजितदादा पवारांना चुकीच्या पद्धतीने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर त्यांची एक इमेज तयार करण्यात आली, हे कुठल्या प्रकारचे षडयंत्र त्यावेळेला त्या पक्षामध्ये होते? असा सवात आता तटकरे-पटेल विचारत आहेत.
नंतर लगेचच २०२३ च्या जुलै महिन्यात २ तारखेला अजित पवारांनी अंतिम निर्णय़ घेतला. या वेळेस दादांच्या समवेत राष्ट्रवादीचे चाळीस आमदारही बाहेर पडले आणि इतिहास घडला. दादांच्या पक्षालाच राष्ट्रवादी हे नाव, गजराचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळाले. शरद पवारांकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्ष नाव व तुतारी फुंकणारा माणूस हे निवडणूक चिन्ह आले. पण त्यांच्याकडचे आमदार खासदार खुष नव्हते. त्यांना अजितदादांबरोबर सत्तेत जाण्याचीच ओढ होती. दादांच्या मृत्युनंतर जे राजकारण सुरु झाले ते मात्र, “अग अग म्हशी, मला कुठे नेशी” चालीचे होते. दादांच्या पक्षाची शेपटी पकडून जयंत पाटील शशिकांत शिंदेसह सारे आमदार खासदार हे महायुतीच्या सत्तेत जाण्यासाठी उतावीळ होते. पण बारामतीत २८ जानेवारीच्या सकाळी जो भीषण विमान अपघात घडला त्यातून या साऱ्या राजकीय हालचाली बंद पडल्या. त्यांना वेगळे वळण लागले. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवारांनी तातडीने दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. त्या लगोलग उपमुख्यमंत्रीही बनल्या. त्यातून शरद पवारांचे सहकारी चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. थोरल्या पवारांची तब्बेतही तितकीशी ठीक नाही. त्यामुळेही पुढच्या निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांना त्यांचा सोईचा मार्ग शोधणे भाग आहे. तो मार्ग बहुतेक जुन्या जाणत्या शरद पवार समर्थकांना अजितदादां बरोबर जाण्याचा दिसला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्पयात या विचाराला बळकटी आली होती. शशिकांत शिंदेंच्या लेखातून तीच सारी मळमळ तळमळ व्यक्त झालेली आहे.
अजितदादा पवारांच्या जाण्याने न भरून येणारे जे नुकसान झाले आहे. याच्यातूनच आत्ता कठे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सावरत आहेत. दादांचा अग्निसंस्कार व्हायच्या आधीच शरद पवार गटाच्या नेत्यांनी २८ तारखेला रात्रीच मुलाखती द्यायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्र या दुःखातून अजुनी डुबलेलाच होता आणि यांनी विलिनिकरणाची आवई उठवून दिली. स्वतः शरद पवारांनी त्या प्रकाराला खतपाणी घातले. १५ जानेवारी रोजीच बारामती येते स्वतः अजित पवारांनी रा.काँ.श.प.च्या नेत्यंना विलिनिकरणाचा शब्द दिला असा व्हीडिओही पवार साहेबांनी जारी केला. जयंत पाटील म्हणाले की माझ्याची ११ वेळा दादांनी विलिनिकरणाच्या चर्चा केल्या. पण इतका मोठा निर्य़ण दादा आपल्या मंत्रीमडंळातील ज्येष्ठ सहकारी हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आदिंना डावलून, पटेल तटकरेंनाही पत्ता न लागू देता घेऊ शकतील यावरच कुणाचा विश्वास नाही. बहुधा दुःखाचे तीन दिवस संपता संपता चौथ्या दिवसीच दादांचा गट शरद पवारांच्या कुशीत लोटण्याचा प्रयत्न होता. तसे झाले असते तर महायुतीपुढे मोठेच संकट उभे राहिले असते. कारण शरद पवारांची आजवरची जाहीर भूमिका महायुतीत सरकारमध्ये दिल्ली वा मुंबईत सहभागी व्हायचे नाही अशीच राहिली आहे. त्यांनी प्रत्येक वेळी राष्ट्रवादीला थोडे पुढे जाऊ दिले पण ऐन वेळी महायुतीपासून मागेच खेचले आहे. अशा स्थितीत जर ३० जानेवारीलाच विलिनिकरणाचा बार शरद पवारांना रोहित पवारांना उडवता आला असता तर तर मग सुनेत्रा या उपमुख्यमंत्री पदी बसल्याच नसत्या. भजबळ मुश्रीफांसह सर्वांना सत्तेबाहेर पडावे लागले असते आणि त्यांची गणना पारभूत व हताश इंडि आघाडीत होऊ लागतील असती. किंवा जर शरद पवार सुप्रिया सुळे यांना आता मोदींच्या सोबतच जाण्याची उपरती झालेली असले तर मग त्या एकत्रित पक्षाच्या नेता निवडीच्या बैठकीत सुप्रिया सुळेंची वा रोहित पवारांची निवड विधिमंडळ नेता म्हणून केली गेली असती आणि त्यांनी मग फडणवीस मंत्रीमडंळातील मानाच्या स्थानी प्रवेश केला असता. पण तो डाव धळला गेला म्हणूनच आता, रोहीत पवार व त्यांचे सहकारी फडणवीस, तटकरे आणि पटेल यांच्यावर घाव घालण्याचे शब्द शोधत आहेत. दररोज पत्रकार परिषदा घेऊन ददांच्या मृत्युवरती संशय व्यक्त करणे, विमानाचा तो अपघात नव्हता, तर घातपात होता हे सांगत राहणे ही नवी रणनिती थोरल्या पवरांच्या सहकाऱ्यांनी उचलेलली दिसते. पण तसले डावपेच शिजण्या आधीच परतवून लावण्याचे काम फडणवीस तटकरे व पटेलांनी करून टाकले आहे. सुनेत्रा पवरांनी नेतृत्व आणि सरकारमधील पद स्वीकारून थोरल्या पवारंची, सुप्रिया व रोहीत यांचीही पंचाईतच करून टाकलेली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *