विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व…

स्लग भारतफ्रान्समधिल मैत्रीचे नवे पर्व ०  जागतिक स्थैर्यासाठी उभय देशातील भागीदारी महत्त्वाची

मुंबई : विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व फ्रान्स आणि भारतात आजपासून सुरु होतेय अशा शब्दात फ्रान्सचे ऱाष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या भारत भेटीचे वर्णन केले. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यानंतर या पत्रकार परिषदेचा फोटो व्टिटरवर पोस्ट करताना मॅक्रॉन यांनी या फोटोसाठी वरील भावना व्यक्त केल्या.

 दरम्यान पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. त्यांनी फ्रान्सचे वर्णन युरोपचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून केले. त्यांनी सांगितले की २०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. काही दिवसांपूर्वी युरोपियन युनियनने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदींनी भारत आणि फ्रान्समधील सौहार्दपूर्ण संबंधांवर भर दिला. तसेच फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे असेही म्हटले की अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मिळून, आम्ही या धोरणात्मक भागीदारीला अभूतपूर्व ऊर्जा दिली आहे.

सावरकरांच्या शौर्याला उजाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शौर्याला उजाळा दिला. त म्हणाले, फ्रान्सचं सर्वात मोठं पोर्ट ज्यातून भारतातील सैनिकांनी पहिल्या विश्व युद्धात आपले पाऊल टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजापासून सुटकेसाठी ज्या जहाजातून उडी घेतली, त्या समुद्राजवळील हे शहर आहे. मला त्यांना अभिवादन करण्याचे सौभाग्य गतवर्षी मिळाले होते. भारताच्या गेट वे मध्ये आज मॅक्रोन यांचे स्वागत आपण करतोय, असे म्हणत मोदींनी मॅक्रोन यांचे मुंबईसह भारतात स्वागत करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भारत-फ्रान्स यांचे संबंध अतिशय जुने आहेत, आपल्या भागिदारीला अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आपण करतोय. ग्लोबल स्टॅबिलिटी आणि विकासाची ही भागीदारी आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मितीचे उद्घाटन त्याचेच उदाहरण आहे. भारत माऊंट एव्हरेस्टपर्यंत पोहोचणार हेलिकॉप्टर बनवणार आहे, आणि निर्यात देखील करणार आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.  आम्ही युरोप सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलय. याला गती देण्यासाठी आपणास नक्कीच फायदा होणार आहे. दुप्पट कर न देण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल, असे मोदींनी म्हटले. इंडिया-फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर असणार आहे. संरक्षण, क्लीन एनर्जी, स्पेसच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सोबतच, संशोधन केंद्रांची उभारणी देखील केली जाईल.  एआय इन हेल्थ, डिजिटल सायन्स इन टेक्नोलॉजी आणि एरोनॉटिक्सची उभारणी आपण करणार आहोत, असेही मोदींनी यावेळी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *