सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन
मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथील सेक्टर ११ मध्ये भक्ती रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा जवळ भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच प्रभाग १९च्या नवनिर्वाचित नगरसेविका शैला पाटील,  शिल्पा ठाकूर,  नगरसेवक भाऊ भापकर,  सुनील कुरकुटे, समाजसेवक   अजय पवार, श्री तानाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर,  नगरसेविका कोमलताई वास्कर, प्रभाग क्रमांक २२चे नगरसेवक अभिजीत देसाई, समाजसेवक मिलिंद सूर्याराव, शुभांगी सूर्याराव, समाजसेवक गणेश पावगे, सानपाडा  ७.५०गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील,  दत्तात्रय कुरळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे  अध्यक्ष मारुती विश्वासराव, चिटणीस जगदीश एकावडे,  उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम,  उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे,  सह खजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी, हास्य क्लब गार्डन ग्रुप ६.३० चे भरत खरात, गार्डन ग्रुप ७.०५ चे जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा टोपी, रुमाल आणि तुलसीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. नगरसेवक भाऊ भापकर आणि समाजसेवक अजय पवार यांनी  विश्वासराव कुटुंबियांच्या विजया इंटरप्राईजेस यांच्यातर्फे महाराष्ट्र सरकार आणि खाजगी सेवा एकाच ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *