हर्षवर्धन सपकाळांची जाहीर दिलगिरी

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण देत छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशीही तुलना केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्याअसल्यास आपण जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे सपकाळ यांनी आज सांगितले.

सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्यास समाजात तेढ निर्माण न होता ऐक्याचा संदेश जावा, हा आपल्या ७० सेकंदांच्या वक्तव्याचा गाभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय असून ते आपले आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सपकाळ यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *