नवी दिल्ली : जगभराला नादावलेल्या आर्टीफिशिएल टेक्नॉलॉजी म्हणजेच एआयच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या समिटमध्ये आज एका कुत्र्यावरून वाद उद्भवला. मेक इन इंडियाचे प्रॉडक्टम्हणून या समिटमध्ये भारतीय युनिव्हर्सिटी नोएडाच्या गलगोटियाने दावा केलेला रोबॅटिक कुत्रा हा मुळ चायनिज बनावटीचा होता. समाजमाध्यमावर ही बनवेगीरी उघडकीस येताच समिटमधून गलगोटिया विद्यापीटाची हकालपट्टी करण्यात आली.
एका व्हिडिओमध्ये या विद्यापीठाने दावा केला होता की एक चिनी रोबोटिक डॉग हा त्यांचा स्वतःचा शोध आहे. व्हिडिओमध्ये, विद्यापीठाच्या प्राध्यापक नेहा सिंह म्हणतात की रोबोटिक डॉगचे नाव ‘ओरियन’ आहे, जे गॅलगोटियास विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केले. त्यांनी असेही म्हटले आहे की विद्यापीठ एआयच्या क्षेत्रात ३५० कोटींची गुंतवणूक करत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, अनेक तंत्रज्ञान तज्ञ आणि वापरकर्त्यांनी दावा केला की ते प्रत्यक्षात चिनी कंपनी युनिटीरी चे गो२ मॉडेल आहे, जो बाजारात २-३ लाखांना उपलब्ध आहे.
चौकट
कुत्रा आमचा नाही,
विद्यापीठाची कबुली
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, गॅलगोटियास विद्यापीठाने म्हटले आहे की, गॅलगोटियासने हा रोबोटिक डॉग तयार केला नाही आणि आम्ही कधीही दावा केला नाही. परंतु भारतात अशाच तंत्रज्ञानाची रचना, अभियांत्रिकी आणि निर्मिती करतील. नवोपक्रमाला मर्यादा नसतात. शिकण्यालाही मर्यादा नसावी. आम्ही जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणत राहू जेणेकरून आमचे विद्यार्थी अभ्यास करू शकतील, आव्हान देऊ शकतील आणि त्यांना सुधारू शकतील आणि शेवटी जागतिक दर्जाचे उपाय तयार करू शकतील.
