रायगड जिल्ह्यात २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यानुसार सोमवार, २ मार्चला होळी, शुक्रवार, २८ ऑगस्टला रक्षाबंधन आणि शुक्रवार, २५ सप्टेंबरला अनंत चतुर्थी या सणांच्या निमित्ताने स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या तीनही दिवशी रायगड जिल्ह्यातील शासनाच्या सर्व खात्यांतील कार्यालये बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
