शिवजन्मोत्सवनिमित्त आज शिवसन्मान ज्योत यात्रा
ठाणे – शिवजन्मोत्सवनिमित्त शिव सन्मान ज्योत यात्रा २०२६ चे आयोजन सकल मराठा समाज, ठाणे व मराठा क्रांती मोर्चा, ठाणे यांच्या वतीने गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सकाळी साडेसात वाजता तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या यात्रेस सुरुवात होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.
या यात्रेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत ५०० हून अधिक शिवभक्त सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, तलावपाली येथून सुरू झालेली ही यात्रा चिंतामणी चौक, टेंभी नाका, उथळसर नाका, माजीवाडा ब्रिज खालून उजवीकडे, कापूरबावडी, ढोकाळी नाका, हिरानंदानी इस्टेट (चौक), वाघबीळ कावेसर नाका डावीकडे, हैप्पी व्हेली, इडेन वुड, गांधीनगर नाका ने उजवीकडे, उन्नती गार्डन, शास्त्री नगर, वैतीवाडी, महानगरपालिका चौक, साईबाबा मंदिर डावीकडे या मार्गे जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ, तलावपाळी या ठिकाणी समारोप होणार आहे. पारंपरिक वेशभूषण ढोल ताशांच्या गजरात ही यात्रा निघणार आहे. तसेच दरवर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप कमी करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे हा निर्णय आयोजकांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला रमेश आंब्रे, सचिन पाटील, प्रविण कदम, दिनेश पवार, समिर देसाई, दिलीप शिंदे, युवराज सुर्यवंशी, संजय जाधव, मंगेश आवळे, पतंगराव कदम, सुनिल कदम, नंदू शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
