एलआयसी १०० रुपये रोज बचत योजनेची घोषणा
मुंबई / रमेश औताडे
जग जसे वेगाने बदलत आहे तसेच एल आय सी ने पण बदलत कात टाकली असून सामान्य ग्राहकाला अजून मोठ्या प्रमाणात जोडता येण्यासाठी रोज १०० रुपये बचत योजना जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या निधीत गुंतवणूक करण्यासाठी दैनंदिन गुंतवणूक रु. १००, मासिक गुंतवणूक रु. २०० आणि तिमाही गुंतवणूक रु. १,००० ने करता येईल.  किमान रक्कम रु. १,००० आहे.
हा निधी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा केंद्र, डिजिटल व्यासपीठ आणि इतर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी होईल आणि ६ मार्च २०२६ रोजी संपेल. नंतर लोक या निधीत पैसे जमा किंवा काढू शकतात. व्यवस्थापक कारण दोशी आणि जयप्रकाश तोष्णीवाल आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. झा म्हणाले की सरकारने सेमीकंडक्टर आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा गुंतवणूकचा संकल्प केला आहे. मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील म्हणाले की या निधीत अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात ज्या सतत वाढत राहतात, चांगला नफा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *