छत्रपती शिवरायांना प्रतिमापूजन यातून महापालिका मुख्यालयात मानवंदना
अशोक गायकवाड
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, अति. शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, सहा. आयुक्त अनुराधा बाबर आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
