मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतली जाणारी दहावीची परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी पासून होईल. शेवटचा पेपर बुधवार १८ मार्च २०२०६ रोजी आहे.
दहावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाईल. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे तर ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ तृतीयपंथी आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या वेबसाईटवर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून नोंदणी पूर्ण झाली आहे आणि राज्यभरातील ५११९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.
