मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ महाअंतिम फेरीत एसएसटीची दमदार भरारी
पोवाडा गायनात तृतीय क्रमांक
कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या जीवन शिक्षण आणि विस्तार  विभागातर्फे आयोजित ‘उडान’ मेगा फायनल राऊंडमध्ये एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयाने पोवाडा गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने पार पडलेल्या ‘शिव शौर्यगाथा’ पोवाडा गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी आणि दमदार सादरीकरणाची उपस्थित मान्यवरांनी विशेष दखल घेतली.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद करांदे, डीएलएलई संचालक डॉ. बळीराम गायकवाड, प्रा. डॉ. कुणाल जाधव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम गायक नंदेश उमप यांची उपस्थिती लाभली होती. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वयक डॉ.खुशबू पुरस्वानी, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी सहाय्यक डीएलएलइचे फिल्ड कॉर्डिनेटर प्रा. दिलीप आहुजा, प्रा.सुदर्शन पाटील, सदान जावरे यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *