सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी
राजीव चंदने
मुरबाड :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती मोठ्या रोमहर्षित वातावरणात विद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मुरबाडचा भूमिपुत्र शिवळे आंबेळे गावचा जलसाकार निखिल वाघचौडे हे उपस्थित होते त्यांच्या  दोनच राजे इथे गाजले या गीताने वातावरण मंत्रमुग्ध केले गेले. शिवजयंती निमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गितगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी सुरेख असे इशस्तवन व स्वागत गीत इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनीनी सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे जेष्ठ प्रा.आर. ए. सुरवसे यांनी स्वीकारले तर सुरेख असे सूत्रसंचालन इयत्ता-८ वी च्या विद्यार्थिनीं सोनल शिंगोळे, हेमलता शिंगोळे, नेहा पष्टे, अनन्या पवार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता देवयानी शिंगोळे हिने आभार मानून केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *