आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा
मुंबई-आरंभ स्पोर्टस आणि मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ फेब्रुवारी मोरया मित्र मंडळ मैदान, चारकोप, कांदिवली (पश्चिम), येथे मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत विविध वयोगटांतील ४५० हून अधिक खेळाडू सहभाग घेणार असून मल्लखांब या पारंपरिक खेळातील कौशल्य व ताकदीचे सादरीकरण होणार आहे.
उद्घाटन समारंभाला प्रख्यात क्रीडा पोषणतज्ज्ञ व व्याख्याता स्वेता बेसिन, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना अध्यक्ष करुणाकर शेट्टी , कार्यवाह आशिष देवल यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून क्रीडा , सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पारितोषिक वितरण समारंभ स्थानिक आमदार संजय उपाध्याय , नगरसेवक . शिवानंद शेट्टी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आयोजन प्रमुख मंदार आंसेगावकर हे स्पर्धा प्रमुख तर राष्ट्रीय खेळाडू निलम राणे या स्पर्धा सचिव म्हणून काम पाहणार आहेत ही स्पर्धा मल्लखांब खेळाचा प्रचार प्रसार व नवोदित मल्लखांब खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे.
