आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात
रमेश औताडे
मुंबई : आशिया खंडात नावाजलेल्या धारावीतील कोळीवाडा परिसरात हिंदू धर्म रक्षक युवा हिंदुत्व संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळीवाडा होळी मैदान येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. गड-किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांचा प्रमुख सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे डबेवाले, शिवसेनेचे धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख किरण काळे, नवनिर्वाचित नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेविका अर्चना शिंदे, मनसेचे धारावी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोनावणे तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिटकर यांची विशेष उपस्थिती होती.
कोळीवाडा येथून सुरू झालेली मिरवणूक संत कक्कया मार्ग, कामराज हायस्कूल ९० फीट रोड, संत रोहिदास मार्ग, धारावी मेन रोड मार्गे पुन्हा होळी मैदान येथे विसर्जित झाली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष कौशिक कोळी, समीर भोईटे यांनी केले. “कोणताही पक्ष नाही, एकच झेंडा तोही भगवा” हाच उद्देश होता.
