दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन
कल्याण: आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन आज कल्याण डोंबिवली महापालिकेत संपन्न झाला. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली चौधरी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, मनसे गटनेते प्रल्हाद म्हात्रे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त वंदना गुळवे, समीर भुमकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
