दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी
दिवा : दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज नारायण म्हात्रे को-ऑप. हौसिंग सोसायटी, खर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सन्मानीय नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका वेदिका साहिल पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील, जयंता वालीकर आणि शक्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सोसायटीतील लहान मुलांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सोसायटीतील वरिष्ठ नागरिकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
सोसायटी कमिटीच्या वतीने मोहन मांडवकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमा साठी कार्याध्यक्ष संदीप कोकणे, उपाध्यक्ष चिलवेरी, खजिनदार रितेश मिश्रा तसेच राहुल शर्मा, मोहन मांडवकर, जीत शुक्ला, संजीव नारायणकर, सुशील राजपूत, दुर्गेश आणि सतीश गंगातीवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गंगातीवरे यांनी केले. यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी गौतम कदम यांनी उपस्थित सर्व रहिवाशांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
