नमुंमपा सभागृह नेतेपदी सागर नाईक व विरोधी पक्ष नेते पदी विजय चौगुले यांची नियुक्ती
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी आज पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १९ – १- अ अन्वये सभागृह नेता म्हणून सागर ज्ञानेश्वर नाईक तसेच अधिनियमाच्या कलम १९ – १- अअ अन्वये विरोधी पक्ष नेता म्हणून विजय लक्ष्मण चौगुले यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
नव नियुक्त सभागृह नेता व विरोधी पक्ष नेता यांचे महापौर श्रीम. सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देउुन अभिनंदन केले.
नमुंमपा स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची निवड जाहीर
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २०(२) सह वाचावयाच्या कलम ३१– अ (२) अन्वये नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले.
या १६ सदस्यांमध्ये जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, शशिकांत भोईर, अशोक पाटील, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज, संदीप म्हात्रे, प्रदीप गवस, सुरेश शेट्टी, सागर नाईक, आकाश मढवी, अनिता पाटील, मंदाकिनी म्हात्रे, दिपाळी सकपाळ, सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. या नवनियुक्त १६ सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनंदन केले.
