माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा
मुकुंद रांजाणे
माथेरान: माथेरान मध्ये एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक असून नेहमीच या बॅंकेत सेवेचा बोजवारा पहावयास मिळत असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सेवा उपलब्ध होण्यास दिरंगाई आणि वेळ लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माथेरान हे पर्यटनक्षेत्र असल्यामुळे मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते सहसा कुणीही रोख रक्कम स्वतःजवळ ठेवत नसल्याने ते याच युनियन बँकेच्या भरवशावर अवलंबून असतात परंतु या बँकेचे एटीएम सुध्दा नेहमीच तांत्रिक कारणास्तव अथवा नेटवर्किंग मुळे बंद असते.याच बँकेची छोटी शाखा एका कुटूंबाकडे देण्यात आली असून त्याठिकाणी सुध्दा अनेकदा सर्व्हर डाऊन असते त्यामुळे काही व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत. येणाऱ्या पर्यटकांना एटीएममधून पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांना बाजारात काही वस्तूंची खरेदी करता येत नाही ग्राहकांसह पर्यटक सुध्दा या बँकेच्या अकार्यक्षम सुविधेबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.माथेरान मध्ये अन्य एखादी राष्ट्रीयकृत बँक उपलब्ध व्हावी जेणेकरून ग्राहकांना याचा नाहक त्रास सोसावा लागणार नाही अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *