मिरा भाईंदर महापालिकेत महासभेचे चित्रीकरण करण्यास पत्रकारांना बंदी

अरविंद जोशी
मिरा -भाईंदर : जनतेच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना जनतेचा आवाज असणाऱ्या पत्रकारांनाच त्याचे चित्रिकरण करण्यास मनाई करण्याचा अजब निर्णय मिरा भाईँदर महापालिकेने घेतल्याने गोंधळ उडाला. सभा सुरू असतानाच मध्ये महापौर डिंपल मेहता यांनी पत्रकारांच्या थेट प्रक्षेपणाला आक्षेप घेत बंद करायच्या सूचना केल्या. लोकसभा,  विधानसभेचे थेट प्रक्षेपण दाखवलं जात असतं तर महापालिकेच का दाखवू शकत नाही असं म्हणत पत्रकारांनी गोंधळ घातला.हा लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा अपमान असल्याचं म्हटलं गेलं.
महापौराना कायद्यानुसार अधिकार असल्याने त्यां अशी सूचना देऊ शकतात असं प्रशासनाने सांगितले. सभा सुरू होण्या पूर्वी किंवा आधीच अशी सूचना का दिली गेली नाही, हे विचारत पत्रकारांचा गोंधळ सुरू राहिला.
सभेनंतर महापौर डिंपल मेहता म्हणाल्या की, कायद्यानुसार थेट प्रक्षेपण करायला त्यांचा विरोध आहे, पत्रकारांनी निष्ठा पाळावी.
यावेळी बोलताना भाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी महापौरांच्या म्हणण्याला आक्षेप घेतला. सभागृहात जे चालू आहे ते लोकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे. थेट प्रक्षेपण बंद करणे चुकीचे आहे हे त्यांनी ठामपणे मांडलं. लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक लोकांसाठी काय करत आहेत, हे त्यांनी थेट बघायला पाहिजे हे त्यांनी ठामपणे मांडलं. पत्रकारांच्या भूमिकेला त्यांनी पाठींबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *