‘मुंबई ड्रम डे २०२६’ची रंगीत तालीम; जागतिक दर्जाचे कलाकार एकत्र
मुंबई : तालवाद्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘मुंबई ड्रम डे २०२६’ या विशेष संगीत मैफिलीपूर्वी जागतिक दर्जाचे कलाकार मरीन ड्राइव्ह येथे रंगीत तालीम करताना एकत्र दिसले. २७ फेब्रुवारी वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये हा भव्य संगीत सोहळा रंगणार आहे.
या कार्यक्रमासाठी जागतिक दर्जाचे ड्रमर गिनो बँक्स, जगप्रसिद्ध मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी, उत्कृष्ट तबला वादक ओजस अधिया, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित कथक व लावणी तज्ञ अदिती भागवत तसेच सुप्रसिद्ध बीट बॉक्सर हार्दिक त्यागी सहभागी होत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम कलाकारांमध्ये अब्बोस कोसिमोव्ह, केन डॅनियल, बेट्टीना कास्टानो, ख्वाब हरिया, सिद्धी शाह आणि सानिध्या दास यांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.
ड्रम सेट आणि विविध तालवाद्यांना समर्पित असलेला ‘मुंबई ड्रम डे २०२६’ हा संगीत महोत्सव ताल, लय आणि ऊर्जा यांचा संगम ठरणार असून मुंबईतील संगीत रसिकांसाठी तो एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *