मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट…
मुंबई: आमदार प्रसाद लाड यांचा मुलगा आणि उद्योजक शुभम लाड यांचा विवाह ७ मार्च रोजी जयपूर येथे संपन्न होणार आहे. यानिमित्ताने आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या पत्नी निता लाड यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना या विवाह सोहळ्याचे आमंत्रण दिले. राजकारणा पलीकडे जाऊन नाती जपली जातात, याचे उदाहरण यानिमित्ताने पाहायला मिळाले.
