संकल्प ज्येष्ठ नागरिक संघात शिवजयंती साजरी.
संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ गोरेगाव यांच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 19 तारखेला महाराष्ट्राचे आद्य आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये जुन्या विविध तिकिटांचे व नाण्यांचे शिवकालीन मुद्रांचे प्रदर्शन प्रमोद नवरे व परब राहणार गोरेगाव यांनी जोपासलेला छंदाचे प्रदर्शन आयोजित केले होते प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मुंबई अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले. त्या प्रसंगी जुन ते सोन जुना इतिहास नवीन पिढी पुढे येणे गरजेचे आहे. सुरेश पोटे यांनी विचार मांडले, प्रदर्शनाला नगरसेवक सुहास वाडकर व नगरसेवक तुळशीराम शिंदे या नगरसेवकांनी व इतर मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन शिवजयंती निमित्त केलेल्या कार्यक्रमाबाबत खूप कौतुक केले. हे सर्व आयोजन संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीप धारकर,सचिव सोडा व संदीप परब यांनी चांगल्या रितीने आयोजन करून पार पाडले.
