अखेर पाच वर्षानंतर महिलांना मिळाला न्याय
सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांचा पाठपुरावा
मुंबई / रमेश औताडे
दावडी.ता.खेड येथील जमीन गट नं ३२४/१/क व ३२४/५ मधील साडेचार एकर क्षेत्राचा ताबा गेली पाच वर्षे चांगुणाबाई गव्हाणे व राणी गव्हाणे यांना मिळत नव्हता. प्रशांत बेडसे तहसीलदार खेड यांच्या १५ सप्टेंबर २०२३ च्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. याबाबत प्रशांत बेडसे तहसीलदार, डॉ.नितीन सुर्यवंशी भुमी-अभिलेख उप अधिक्षक खेड यांच्या सहकार्याने व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या पाठपुराव्यानुसार ताबा प्रक्रियेची अंमलबजावणी आज दावडी येथे करण्यात आली.
यावेळी उप अधिक्षक भूमी-अभिलेख डॉ.नितीन सूर्यवंशी,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे,माणिक गायकवाड मंडल अधिकारी पिंपळगाव,भुकरमापक नामदेव कोल्हे व महसूल खात्याचे कर्मचारी उपस्थित होता.खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली होती.यावेळी चांगुणाबाई गव्हाणे व प्रतिवादींमधील वादाचे सामंजस्याने निराकरण करण्यात आले.
खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचा सत्कार करताना अशोकराव टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते. चांगुणाबाई गव्हाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड वासिम सामलेवाले यांचेमार्फत रिट याचिका दाखल केली होती.सरकारी अभियोक्ता यांनी १८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयास सात,दिवसात ताब्याची अंमलबजावणी करण्याबाबत लेखी पत्र दिले होते.
प्रशांत बेडसे तहसीलदार खेड यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्याशी चर्चा करून गव्हाणे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. २० फेब्रुवारी रोजी हद्द दाखवून ताबा देण्याची प्रक्रीया उपअधिक्षक भूमी-अभिलेख खेड नितीन सूर्यवंशी,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्या उपस्थितीत पुर्ण करण्यात आली.
