कल्याण पूर्वेतील शिवप्रेरणा यात्रेत ५०० हून अधिक वारकऱ्यांचा जागर
आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज आणि संजय राघो काळोखे ‘शिवकल्याण पुरस्कार – २०२६’ ने सन्मानित
कल्याण : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या वतीने शिवजयंती निमित्त सिध्दार्थ नगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाच्या सुमारे ५०० हून अधिक वारकरयांनी सहभाग घेवून हरिनामाचा गजर केला. या उत्सवात कल्याण पूर्वेच्या नावलौकिकात भर घालणारे आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज तसेच संजय राघो काळोखे यांना कल्याणकरांसाठी मानाचा म्हणून ओळखला जाणार ‘शिवकल्याण पुरस्कार २०२६ ‘ हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सुमारे ५०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत सामूहिक हरिपाठ करण्यात झाला. या समयी हरिनामाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. या वेळी आपल्या कतृत्वाने उल्लेखनीय कार्य करणारे आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज तसेच संजय काळोखे यांना आमदार सुलभा गायकवाड, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे या मान्यवरांच्या हस्ते ‘शिवकल्याण पुरस्कार २०२६ ‘ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. . सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणूक व प्रेरणा यात्रा . या प्रेरणा यात्रेत द्वारका विद्या मंदिर नांदीवली, नुतन ज्ञान मंदीर, मॉडेल कॉलेज आणि हायस्कुल, जय हनुमान दांडपट्टा पथक, तिसाई बिटस् बॅण्ड पथक, बासरीवाला ढोल ताशा पथक, मैत्रेय संगत, सहयोग सामाजिक संस्था, शाम बाबु गुप्ता आणि पथक, आदि संस्था संघटनांच्या सहभागासह कल्याण शहर वारकरी सांप्रदाय प्रबोधन ट्रस्ट या आध्यात्मिक संस्थेचे ५००हून अधिक वारकरी आणि सेवेकरी सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“नामात विठ्ठल, कर्मात शिवराय” या संकल्पनेनुसार आणि ह.भ.प. जगन्नाथ रामभाऊ नेहरकर महाराज यांच्या अध्यक्षते खाली साजरा झालेल्या या शिवजयंती उत्सवात भक्ती आणि शौर्य यांची सांगड घालणारा हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना मंडळाचे विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी आणि विष्णू जाधव यांनी व्यक्त केली. या शिव प्रेरणा यात्रेत आमदार सुलभा गायकवाड, नगसेवक रमेश जाधव, निलेश शिंदे, सचिन पोटे, नगसेविका मनिषा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्यासह संजय मोरे, सुभाष म्हस्के, राजु अंकुश, रमाकांत देवळेकर, विवेक जगताप, प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले आदी मान्यवर आणि विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *