फक्त ६७० रुपये वीज बिल थकीत असताना वीज पुरवठा केला खंडीत
बील भरुन २४ तास उलटले तरी वीज पुरवठा सुरळीत नाही
घरात ८० वर्षाची आजी आणि मतीमंद मुलगा २४ तासापासून अंधारात
कल्याण : कल्याणमध्ये वलीपीर रोड परिसरात महावितरणचा अतिशय धक्कादायक गलथान कारभार समोर आला आहे. येथील रहिवासी युसुफ मेमन यांचे केवळ ६७० रुपये वीज बिल थकीत असताना महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला. ६७० रुपये बीज भरल्यानंतर २४ तास उटूनही वीज पुरवठा सुरळित केला गेला नाही. त्या घरात एक ८० वर्षाची आजीबाई आणि त्यांचा मतीमंद मुलगा आहे. २४ तासापासून दोघेही अंधारात आहेत. बील भरले नाही म्हणून पुरवठा खंडीत केला. बील भरल्यानंतर २४ तासानंतर ही पुरवठा सुरळित केला गेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार का असा प्रश्न युसुफ मेमन यांनी उपस्थित केला आहे.
