आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल शहरातील खेळाडूंची १३ पदकांची कमाई

ठाणे: नवी दिल्ली येथे वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया तसेच जेके टायर यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग २०२६ च्या स्पर्धेत पनवेल येथील खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना‌‌ ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य अशी एकुण १३ पदकांची कमाई केली. के.डी जाधव इनडोअर इंदिरा गांधी स्टेडियम येथें स्पर्धा  आयोजित करण्यात आली होती.

भारतीय संघामध्ये पनवेल शहरांमधील १० खेळाडूंची निवड करण्यात आली होती तसेच संपूर्ण महाराष्ट्र मधून ९१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता पॅलेस्टाईन, उझबेकिस्तान, इराक, इटली, कझाकिस्तान, स्विझर्लंड, नेपाळ, युरोप यांच्यासहित २५ देशातील खेळाडूंचा समावेश ‌स्पर्धेत होता. पनवेलच्या अर्णव इंगोलेने २ सुवर्ण पदके मिळवली तर अन्वी निकम, काव्य सेजलला प्रत्येकी एक सुवर्ण पदक मिळाले. रोनल पाटीलने २ रौप्य पदकांची कमाई केली. शुभम पवार, सानिया शेखला देखील रौप्य पदक मिळाले. श्रेया कुडलकरने २ कांस्य पदक पटकावली तर प्रणव लब्दे, शुभम पवार, आर्यन शिवतरकर यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक मिळवले. पदक विजेत्या खेळाडूंना पनवेल शहर किकबॉक्सिंगचे अध्यक्ष परेश ठाकूर, सचिव मंदार पनवेलकर, कार्याध्यक्ष व सीनियर प्रशिक्षक निलेश भोसले, प्रशिक्षक योगेश बैकर, रोहित थळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *