नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी
नवी मुंबई: स्वच्छता, सामाजिक न्याय आणि सुधारणांवर भर देणारे आधुनिक संत म्हणून नावजले गेलेल्या संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, नगरसेविका माधुरी सुतार, सायली शिंदे, शैला पाटील, प्रिती भगत, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त अमोल पालवे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता तानाजी शिंदे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
