नवी मुंबई महानगरपालिकेत १२ परिवहन सदस्य नेमणूक
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २५(२) अन्वये, प्रशासनाचा किंवा परिवहनचा अनुभव असलेल्या तसेच अभियांत्रिकी, औद्योगिक, वाणिज्यिक, वित्तीय किंवा कामगार विषयक बाबतीत ज्यांची क्षमता दिसून आली असेल तसेच जे पालिका सदस्य असतील वा नसतील अशा व्यक्तींमधून परिवहन समितीवरचे सदस्य म्हणून १२ व्यक्तींची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आज महासभेच्या पटलावर घेण्यात आला.
या १० परिवहन सदस्यांमध्ये राहुल चंद्रकांत शिंदे, राजेश हौसला राय ,विकास कुंडलिक झंझाड, शितल श्रीपत भोईर, रोशन रामचंद्र पाटील, राजश्री नारायण कातकरी, विनोद तुळशिराम म्हात्रे, यशपाल सिद्राम ओव्हाळ, कुणाल प्रकाश महाडिक, हनुमंत कोंडीबा रोडे, अभिजीत प्रकाश पेडणेकर, तिर्था मारूती सकपाळ आदी मान्यवरांची निवड झाली असून त्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौरदशरथ भगत आणि आयुक्त डॉ.कैलाश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
