महापालिका शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधण्याचा आनंद वेगळाच –  दत्तू मोरे

अनिल ठाणेकर

ठाणे- ‘स्वत: ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. १११ चा माजी विद्यार्थी असून शाळेत असताना याच मंचावरुन मला प्रथम क्रमाकांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. शाळेच्या मंचावरुन सुरू झालेला हा प्रवास आज हास्यजत्राच्या मंचापर्यत पोहचला आहे, त्यामुळे आज शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधताना एक वेगळाच आनंद वाटत आहे’, असं हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता म्हणून ओळख मिळेपर्यंत कसा झाला, याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित मध्यवर्ती सांस्कृ तिक महोत्सव २०२५-२०२६ हा आज दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गडकरी रंगायतन येथे उत्साहात व जल्लोषात पार पडला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपआयुक्त उमेश बिरारी, उपआयुक्त (शिक्षण) मिताली संचेती, नगरसेवक मनोहर डुंबरे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने झाली.  या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये एकूण १०२ शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इयत्ता १ ली ते ५ वी नृत्य विभाग, इयत्ता ६ वी ते ८ वी नृत्य विभाग तसेच इयत्ता १ ली ते ८ वी नाट्य विभाग अशा विभागनिहाय स्पर्धा दि. २३ व २४ डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. इयत्ता १ ली ते ५ वी नृत्य विभाग: शाळा क्र. ५३ – प्रथम क्रमांक, इयत्ता ६ वी ते ८ वी नृत्य विभाग: शाळा क्र. ५९ – प्रथम क्रमांक, नाट्य विभाग: शाळा क्र. ११ – प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या कलागुणांना उत्तेजन देणारे मनोगत व्यक्त केले. मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता चौधरी, उपकार्याध्यक्षा नीलिमा पाटील, चिटणीस वर्षा मटकर, सहचिटणीस आशा पाटे, युआरसी प्रमुख रविंद्र पाटील, मुश्ताक पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे व गटाधिकारी संगीता बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. तसेच ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबाजी फापाळे, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक जगन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील व वनिता जाधव यांनी प्रभावीपणे केले.एकूणच उत्साह, जल्लोष आणि आनंदाने ओतप्रोत भरलेला हा मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.खांचे नववे गुरु, “हिंद दी चादर” परमपूज्य गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित भक्तिगीताचे समूहगान सादर करण्यात आले. मनपा शाळा क्र. १३ व ४१ च्या विद्यार्थिनींनी सुरेल ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *