विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्यातील

महाराष्ट्र अंनिसच्या बुकस्टॉलला ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद

अनिल ठाणेकर

ठाणे: जिल्हा न्याय प्राधिकरण आयोजित विधिसेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यातील ठाणे महाविद्यालयाच्या प्रांगणातील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती-ठाणे शहर शाखेच्या बुकस्टॉलला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी महाराष्ट्र अंनिस राज्य प्रकाशन विभाग कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंढे, राज्य कायदे विभाग पदाधिकारी ॲड तृप्ती पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुषमा बसवंत, ठाणे शहर प्रधान सचिव अशोक मोहिते, पुस्तक प्रकाशन व वितरण विभाग कार्यवाह प्रमोद तामसे यांनी सहभाग नोंदविला.

दिवसभर अगदी सकाळी १० पासूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती-ठाणे शहर शाखेच्या या बुकस्टॉलला विविध जनसमुह भेट देत होते. हळूहू ही गर्दी वाढतच होती. महा अंनिसचे कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंढे यांनी, पैशांचा पाऊस पाडणे, नारळात कपड्यांचे तुकडे दाखवणे, मनातले आकडे ओळखणे, लिंबूमधून दोरा फिरवल्यास दोऱ्याचा रंग बदलणे, नाकातून दूध टाकून कानातून काढणे, तांदळाचा चंबू मंत्राचा साहाय्याने उचलणे आदी चमत्काराच्या प्रयोगातून उपस्थितांचे प्रबोधन केले. लोकांनी यावेळी मोठ्यासंख्येने पुस्तक विक्री केली.ज्येष्ठ साहित्यिक यशवंत बैसाने यांनीही अनिसच्या या बुकस्टॉलला भेट दिली. जिल्हा न्यायाधीशांनी महा. अंनिसच्या सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *