मिरा -भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुकत्तालयाची एकूण ८७९ पदांसाठी पोलीस भरती

मिरा – भाईंदर

सुभाषचंद्र मैदान,  भाईंदर येथे पोलिस आयुक्तालयाची मोठ्या उत्साहात आणि कडक देखरेखीखाली २०२४-२५ ची पोलिस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ८७९ रिक्त पदांसाठी या भरतीसाठी एकूण ५७९९० अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यामुळे स्पर्धा अत्यंत कठीण झाली आहे. या भरतीत ८४० पोलिस कॉन्स्टेबल आणि ३९ ड्रायव्हर पदे भरली जाणार आहेत.  २५ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत रोज २५०० उमेदवारांची चाचण्या घेतल्या जाणार आहेत.  १०० मीटर आणि १६०० मीटर आणि गोळफेक अश्या तीन ५० मार्कांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी केली जात आहे, ज्यासाठी ६९ कॅमेऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे. मैदानाबाहेर सुरळीत वाहतूक राखण्यासाठी विशेष पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही अनियमिततेसाठी कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सुभाषचंद्र बोस मैदानात होणाऱ्या या भरतीत डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी मोफत पिण्याचे पाणी आणि बिस्किटे दिली जातात आणि तक्रार निवारण कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *