अजित दादांच्या मृत्यूस कारणीभूत व्हिएसआरच्या विमानांस उड्डाण बंदी
रोहीत पवारांनी पहिली लढाई जिंकली.0 चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना बंदी
नवी दिल्ली : अजित पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्हिएसआरच्या विमानांना केंद्र सरकाराने दणका दिला आहे. त्यांच्या चार विमानांना भारतात उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून व्हिएसआ व्हेंचअर्सच्या चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिअरजेट 40/45 या मॉडेलच्या चार विमानांना उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे. या विमानांमध्ये उणीवा आढळल्यामुळं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे. यापूर्वी रोहित पवार.यांनी लिअरजेट विमानाच्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानांचे उत्पादन अमेरिकेत होते. ही विमाने अमेरिकेत अनेक वर्ष वापरली गेली होती. त्यानंतर ती भारतात आणली होती असे रोहित पवार यांनी सांगितले होते. याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
डीजीसीएची ही कारवाई म्हणजे आमच्या लढ्यास आलेले नखाएवढे यश आहे. अजून खुप मोठी लढाई लढायची बाकी आहे अशी प्रतिक्रीया रोहीत पवारांनी दिली.
डीजीसीएच्या अहवालानुसार, विमानाच्या एअरवर्दीनेस म्हणजे उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालातून देण्यात आला आहे. विमान प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही. निष्कर्षाच्या आधारे व्हीएसआर कंपनीची चार लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या व्हीडी- व्हीआरे, व्हीटी-व्हीआरएस, व्हीटी-व्हिआरए आणि व्हीटी- व्हीआरआय या चार विमानांची उड्डाणं करू नयेत असं या अहवालात म्हटलं आहे.
