केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
कल्याण : ८ मार्च २०२६ रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा करिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्य क्षेत्रातील सर्व महिलांनी आपण केलेल्या कामगिरी बाबतची संपूर्ण माहिती कागदपत्रे अर्जा सहित महिला व बालकल्याण विभाग, कल्याण डोंबिवली महानगपालिका येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी केले आहे.
