फलाटांची उंची कधी वाढणार?
मुंबई ते कसारा मार्गावर वाढत्या अपघातानंतरही रेल्वे प्रशासन ढीम्म
अविनाश उबाळे
मुंबई : लोहमार्गावरील मध्य रेल्वेच्या मुंबई ते कसारा मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकावरील फलाटाची उंची कमी असल्याने लोकलमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.रेल्वे स्थानकांवरील फलाटची उंची कमी असल्याने लोकलमधून उतरताना व लोकल मध्ये चढताना फलाटांमधील अंतरामध्ये पडून अपघात होत आहेत.रेल्वे स्थानकांवरील ही समस्या प्रवाशांकरता चिंताजनक बनली आहे.
रेल्वे प्रशासनाकडूर गाडीतूर चढताना आणि उतरताना  गाडीचे पायदान व फलाटांमधील अंतरावर लक्ष ठेवा,अशा सूचना केल्या जात आहेत.मात्र प्रत्यक्षात रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची वाढवण्याचे काम रेल्वे प्रशासन केव्हा करणार ? असा संतप्त सवाल मध्य रेल्वेने रोज प्रवास करणारे हजारो रेल्वे प्रवासी आता रेल्वे प्रशासनाला विचारत आहेत.फलाटाच्या कमी उंचीमुळे लोकलमध्ये चढताना आणि उतरताना रेल्वेतून यापूर्वी अनेक प्रवासी पडल्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत.यामध्ये फलाटाच्या गॅपमध्ये पडून मृत्युमुखी पडल्याच्या तसेच  यामध्ये काहीजण जखमी झाल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत तर या अपघातामध्ये अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.या अपघाताच्या नोंदी आपणास रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या दफ्तरी पाहावयास मिळतात.रेल्वे फलाटाची कमी उंची व यातील (गॅपमुळे) अपंग व्यक्ती व लहान मुले,वृद्ध व स्त्रियांना,लोकलमध्ये चढता आणि उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे प्रवासी या समस्येमुळे त्रस्त आहेत.या समस्येकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.मात्र याकडे रेल्वे प्रशासन हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे.
प्रतिक्रिया-
कल्याण ते कसारा या मध्य रेल्वे दरम्यान असलेल्या काही रेल्वे फलाटांची उंची फारच कमी आहे.रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.फलाटांची उंची वाढविण्या संदर्भात रेल्वे प्रशासनास लेखी पत्रव्यवहार आम्ही संघटनेच्या वतीने करणार आहोत.
-जगदीश धनगर
अध्यक्ष कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *