भविष्यवेधी परिषद
भारताने नवी दिल्लीमध्ये 16 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‌‘इंडिया ॒एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’ या जागतिक स्तरावरील एका मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदचे आयोजन केले. त्यासाठी जगभरातून एआय तज्ज्ञ, व्यवसाय जगतातील मान्यवर, स्टार्टअप्स, विद्यार्थी अशा अनेकांनी हजेरी लावली. त्यात ‌‘ओपन एआय‌’चे (चॅटजीपीटी निर्माते) प्रमुख सॅम ऑल्टमन, गूगल/अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, अँथ्रोपिकचे सीईओ डॅरिओ अमोडी यांच्याबरोबरच हजारो स्टार्टअप्स आणि एआय प्रोडक्ट डेव्हलपर्स यांचा समावेश होता. त्याचबरोबर विविध टेक आणि मशीन लर्निंग कंपन्या, वीसहून अधिक देशांचे देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पाचशेहून अधिक जागतिक एआय तज्ज्ञांनीही या परिषदेला हजेरी लावली. शिवाय येथे 300 हून अधिक कंपन्या आणि स्टार्टअप्सनी त्यांचे तंत्रज्ञान आणि ॒एआय आधारित उत्पादनांचे प्रदर्शन केले.
परिषदेचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे ॒एआय क्षेत्रात ग्लोबल साउथचा आवाज आणि प्रभाव वाढवणे, हे क्षेत्र केवळ अमेरिका कवा युरोपियन युनियनपुरते मर्यादित राहू न देता विकसनशील देशांनाही एआय नियमन आणि उपयोगात भाग घेता यावा, वैश्विक नियम, नैतिकता, जबाबदार एआय, रोजगार आणि सामाजिक परिवर्तनाचा व्यापक विचार केला जावा, ही होती. एआय तंत्रज्ञान मानवासाठी उपयुक्त असले तरी त्याचे अनेक गंभीर धोकेही आहेत. एआयचे समर्थन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान मानवसेवेच्या क्षेत्रात सुधारणा करेल. यामुळे नियमित, खोट्या कवा त्रुटीपूर्ण कामांपासून मुक्त होण्यास मदत होईल, एआयमुळे अनेक रोजगार जातील अशी भीती वाटत असली तरी एआयमुळे रोजगाराचे प्रकार बदलतील आणि अनेक नवे रोजगार अस्तित्वात येतील. एआय विरोधकांच्या मते एआयमुळे काही उद्योग आणि पारंपरिक कामे कमी होऊ शकतात, डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अर्थात अद्याप तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर यासंदर्भात ठोस नियमन नसल्याने एआयच्या दुरुपयोगाची मोठी भीती आहे. यामुळेच एआयचा वापर मानव कल्याणासाठी व्हावा, त्याच्या गैरवापरावर कडक निर्बंध असावेत अशी सगळ्यांचीच मागणी होती. त्यासाठी भारताने पुढाकार घेतला आणि ‌‘इंडिया ॒एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’च्या व्यासपिठावर सर्वंकष चर्चा घडवून आणली. यातून नक्कीच काही तरी चांगले घडेल याची खात्री वाटते.
भारत मंडपममध्ये एकीकडे विविध कंपन्यांच्या एआय सेवा आणि उत्पादनांचे प्रदर्शन सुरू होते तर दुसरीकडे एकाच वेळी विविध दालनांमध्ये एआयशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. सुमारे दीड तासाच्या चर्चासत्रांमध्ये जगातील विविध देशांमधून आलेल्या या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. या चर्चासत्रांमध्ये उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली जात होती. अशी चर्चासत्रे रोज दिवसभर सुरू होती. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि रुची असणाऱ्या मंडळींसाठी ही एक मोठी पर्वणी होती. या चर्चासत्रांमध्ये एआय आणि रोजगार, संधी आणि धोके, सुरक्षित आणि जबाबदार एआय, एआय आणि सर्वसमावेशक विकास, सुरक्षा आणि संरक्षणात ॒॒एआय असे अनेक विषय चर्चिले गेले. यात तज्ज्ञांनी मुख्यत: एआयच्या उपयुक्ततेवर भर दिला. त्यांच्या मते ॒एआयमुळे उद्योगक्षेत्रात आणि रोजच्या कामात बदल तर होणार आहेत, पण एआय रोजगारांचे स्थान घेणार नाही, तर नवी कौशल्ये आणि संधी निर्माण करेल. काही तज्ज्ञांच्या मते एआयमुळे पारंपरिक नोकऱ्यांमध्ये बदल दिसून येईल आणि या बदलाशी जुळवून घेण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील आणि त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. या चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांनी एआयचा हानीकारक वापर होऊ नये, यासाठी जागतिक स्तरावर नियमन आणि मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याचा आग्रह ठेवला. अर्थातच त्याला विविध राष्ट्रप्रमुख, राजकीय नेते आणि कएआय कंपन्यांचे सीईओ आदींनी अनुमोदन दिले. यात विशेषत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ॒॒एआयचा वापर कसा मर्यादित करायचा कवा चुकीची माहिती कशी रोखायची, यावर सखोल चर्चा झाली.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ॒॒एआय कसे वापरता येईल, भाषा अनुवादाचे ॒॒एआय उपयोजन, ग्रामीण भागात ॒॒एआय आधारित सेवांचा वापर यावरही चर्चा करण्यात आली. भारतीय लष्कराने वेहिकल ट्रॅकग सिस्टीम, डीपफेक डिटेक्शन, एआय फेशियल रेकग्निशन सिस्टीम अशा ॒॒एआय आधारित प्रकल्पांचे विविध उपयोग सादर केले. या प्रकल्पांची भविष्यात सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात मोठी मदत होऊ शकेल. समिटमध्ये केवळ चर्चासत्रेच आयोजित करण्यात आली होती, असे नाही तर विविध ॒एआय सेवा, उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. यात शिक्षणात एआयचे उपयोग, आरोग्यसेवांमध्ये ॒एआयचा वापर, सुरक्षा तंत्रज्ञान- डीपफेक शोध, चेहरे ओळख (फेशियल रेकग्निशन), वेहिकल ट्रॅकग, पर्यावरण आणि मशीन लर्निंग आधारित डेटा मॉडेल्स, व्यापार आणि कृषि, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांमध्ये एआयचा उपयोग किती प्रभावी पद्धतीने करण्यात येत आहे, याची माहिती मिळाली. शिक्षणात तर भाषा अनुवाद, डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म्स यासाठी एआयचा वापर होतच आहे, पण आरोग्यसेवांमध्येही एआय मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. एमआरआय, एक्स रे आणि विविध चाचण्यांच्या रिपोर्टसवरून एआयच्या मदतीने व्याधी निदान केले जात आहे. त्यात अचूकताही येत आहे.
उर्जा व्यवस्थापन, हवामान अंदाज अशा क्षेत्रांमध्ये मशीन लर्निंग आधारित डेटा मॉडेल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. हे आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सुरू झालेला एआयचा वापर या प्रदर्शनात दिसून आला. विशेषत: डेटा ॲनॅलिसिस करावे लागणाऱ्या क्षेत्रांसाठी तर एआय आणि मशिन लर्निंग वरदान ठरत आहे. हे तंत्रज्ञान जनजीवनात विविध समस्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. पुरुष, स्त्री, युवा कवा वृद्ध अशा सर्वांनाच एआयचा लाभ मिळू शकेल. ‌‘एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’ सर्वसमावेशक, जागतिक दृष्टिकोनातून ॒एआयचा उपयोग, धोके, नियम, सामाजिक परिणाम आणि करिअरच्या संधी याबद्दलची साधकबाधक चर्चा करणारे मोठे व्यासपीठ ठरले. या समिटचा प्रभाव सुगम ॒एआय आणि एआय-एनेबल्ड भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *