लबाड सरकार ढोंग करतय- भास्कर जाधव

मुंबई : सराकर लबाड असून ते नुसतेच ढोंग करतेय. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्याचा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

सरकारकडे तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काय आहे?राज्यपालांच्या भाषणात मुद्दे येणे विषयी ही आजपर्यंतची प्रथा परंपरा आपण अनुभवली. पण यावेळचे राज्यपालांचे भाषण हे बेचव होतं. कोणतेही प्रकारे उत्साहवर्धक नव्हते. कोणालाही उत्सहा वाटेल असं नव्हतं, राज्यपाल साहित्यिक असावे असं मला वाटतं असा टोला जाव यांनी लगावला. तसेच लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन देखील जाधव यांनी सरकारवर टीका केली.

सरकारच्या फसव्या घोषणांचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी विरोधकांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या उत्पादनांची माळ घालून आंदोलन केले.

टाटा, वेदांत, बल्क ड्रग पार्क असे मोठे प्रकल्प या राज्यात आलेले आणि कोणाला तरी जी हुजूर करावंलागत म्हणून गुजरात ला पाठल्याची टीका जाधव यांनी सरकारवर केली. ज्या योजना केल्या होत्या त्याच काय असित्व आहे. नवीन घोषणा करता, इव्हेंट करता. २०२४ मध्ये लाडका भाऊ आणलेला १० लाख तरुणांना नोकरीं देणार सांगितलं. माझ्याककडे व्ह डिओ किल्प आहेत. आज ती मुलं वणवन फिरत आहेत.
अपल्याला लाडकं काही न्हवत फक्त खुर्ची होती. खुर्ची मिळाली, आता लाडका भाऊ पण गेला आणि बहिण पण गेली अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *