वैनगंगा-नळगंगा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
जल अभ्यासक डॉ.प्रवीण महाजन यांच्या प्रयत्नाला मोठे यश
 राजेंद्र साळसकर
मुंबई : पश्चिम विदर्भाला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या आणि १४ वर्षांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असलेला महत्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देऊन विदर्भवासियांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच नागपूर भेटीत जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत मागणी केली. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प नकाशा नसल्याने सातत्याने होणाऱ्या शेतकरी आत्महत्या व नापिकीमुळे शेतकऱ्यांचे, कामकऱ्यांचे जगणे कठीण झाले होते. यावर उपाय म्हणून वैनगंगा नदीतून आपल्या हिश्यातील वाहून जाणारे पाणी नदीजोडद्वारे वळविल्यास पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतीकरिताया पाण्याचा उपयोग करून त्यांचे जीवनमान उंचावल्या जाऊ शकते. याकरता डॉ. महाजन यांनी ही मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीसांनी जलसंपदा विभागाला सदर विषयाबाबतचा स्थितिदर्शक अहवाल शासनास त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जलसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी यावर अभ्यास करून अहवाल सादर करण्यात यावा,या आदेशाद्वारे त्यांनी अहवाल तयार केला. यानंतर राज्य तांत्रिक सल्लागार समिती,जल विदन्यान व धरण सुरक्षितता विभाग,राष्ट्रीय  जल विकास प्राधिकरण,  महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण ( MWRRA ), या सर्वांनी नदीजोड प्रकल्पाच्या अहवालाची छाननी करून मागील आठवड्यात प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.त्यानंतर मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मंजूरी प्रदान करत या नदीजोड प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखवून  विदर्भपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ वासियांचे स्वप्न पूर्ण केले आहे. प्रसिद्ध जल अभ्यासक डॉ.प्रवीण महाजन यांनी वैनगंगा – नळगंगा या नदीजोड प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन २०१४ साली लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.तसेच  गेली १२ वर्षे म्हणजे एक  तप या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता.या मान्यतेमुळे डॉ.प्रवीण महाजन यांच्या एक तपाच्या या  तपश्चर्येला मोठे यश मिळाले असून त्यांची तपश्चर्या फळाला आल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *