शहापूर,मुरबाड,भिवंडी या तालुक्यातील आदिवासींच्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर
शेकडो मुले शिक्षणापासून वंचित
अविनाश उबाळे
ठाणे -ठाणे जिल्हयातील शहापूर,मुरबाड, भिवंडी,या तालुक्यातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील आदिवासी कुटुंबांनी मोठ्या प्रमाणावर शहराकडे वीटभट्ट्यांवर रोजगारासाठी स्थलांतर केल्याचे वास्तव समोर येत आहे. या स्थलांतरामुळे आदिवासी कुटुंबातील शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे.
त्यामुळे शिक्षण हक्क कायद्यानूसार शाळाबाह्य मुलांना त्यांच्या पालकांच्या कामाच्या ठिकाणापासून जवळच्या शाळेत प्रवेश देण्याच्या तसेच शिक्षण सत्रात सामावून घेण्याच्या राज्य सरकारच्या सुचना आहेत. मात्र सरकारच्या या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली नसल्याने आजही अनेक शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र ठाणे जिल्हयात पाहण्यास मिळत आहे. विशेषतः शहापूर, मुरबाड, भिवंडी या गाव खेड्यांतील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील आदिवासी दरवर्षी रोजगाराच्या शोधात इतरत्र स्थलांतर करावे लागत असल्याने आदिवासी शेतमजूरांची शेकडो मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे शहापूर, तालुक्यातील वासिंद ,किन्हवली ,डोळखांब , खर्डी ,कसारा ,परिसरातील आदिवासींनी रोजगाराच्या शोधात आपल्या पोराबाळांसह शहराची वाट धरली आहे दिवाळी नंतर मोठ्या प्रमाणावर ठाणे जिल्हयातील शहापूर,मुरबाड,भिवंडी,या तालुक्यातील वाड्या वस्त्यावरील आदिवासी कुटुंबे शहराकडे मुक्कामी आहेत असे चित्र बहुतांश आदिवासी वस्त्यावंर भेटी दिल्या असता नजरेस पडते आहे कल्याण ,भिवंडी ,ठाणे ,वसई ,विरार,भाईंदर ,मीरारोड ,या शहरी भागांत व काही ग्रामीण भागातील वीट भट्टयांवर तसेच इमारतीच्या बांधकामांवर हे मजूर रोजगारासाठी आपले गाव सोडुन इतरत्र स्थलांतरीत झाले आहेत वीटभट्टी व इमारती बांधकाम नजीकच झोपड्या करुन त्यांनी आपला संसार थाटल्याचे चित्र आहे या रोजगाराच्या भटकंतीत मात्र त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्नपण जठील बनला आहे असे असतानाही शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात सामावून घेतले नसल्याने रोजगाराच्या भटकंतीत मात्र त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्नपण जठील बनला आहे .
——————————————————————-
पोटासाठी स्थलांतर सरकारी रोजगार हमीला घरघर
मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्हयातील दुर्गम भागातील आदिवासींची उपासमर होऊ नये याकरिता राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी रोजगार हमी योजना सुरु केली होती मागेल त्याला काम असे ब्रीदवाक्य असलेल्या रोजगार हमी योजनेची आता अंत्यत दयनीय परिस्थिती झाली आहे रोजगार हमीची कामे ठप्प आहेत काही ठिकाणी थोडीबहुत कामे सुरु असली तरी या कामांवर दिली जाणारी सरकारी मजुरी तुटपुंजी असल्याने आदिवासी कुटुंब समाधानी नाहीत परिणामी जास्त मजुरी व रोख मजुरीच्या शोधात आदिवासी दरवर्षी वीटभट्टयांची वाट धरतात. ग्रामीण भागातून हजारो कुटुंबे शहराकडे रोजगारासाठी वळत आहेत मात्र हे स्थलांतर थांबलेले दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे .
