शिवसेनाप्रमुखांची जन्मशताब्दी निमित्त आदिवासी बांधवांना विविध वस्तुंचे वितरण

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बोरीवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना विविध प्रकारच्या वस्तुंचे वितरण करण्यात आले. शिवसेना उपनेते, आमदार मनोज पांडुरंग जामसूतकर व प्रभाग क्रमांक २१० च्या नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांच्या संकल्पनेतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, पूर्व मधील नवापाडा या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, गरजू आदिवासी महिलांना साडी वाटप, ज्येष्ठ नागरिकांना शालींचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभाग प्रमुख उद्देश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, महिला विधानसभा प्रमुख रेखा बोऱ्हाडे, नगरसेविका सारिका झोरे, सिनेट सदस्य व विधानसभा संघटक मिलिंद साटम, सिनेट सदस्य व मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, महिला शाखा संघटक माधुरी खानविलकर, शाखासमन्वयक योगेश देसाई, महिला शाखासमन्वयक इतीश्री महाडिक, उपशाखाप्रमुख दशरथ पाटील व युवासेना शाखा अधिकारी आशिष सोंडकर , उपशाखाधिकारी वैभव पांचाळ, स्वीय सहायक अभि ठाकूर, तुषार साळुंके, विशाल देसाई, राजेश माने, संतोष पवार, ललित शेळके, आशिष सुर्वे, संतोष चव्हाण, हरीश रेडकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन मागाठाणे विधानसभा संघटक अरुण पवार व शाखाप्रमुख सचिन मोरे यांनी केले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *