इस्रायलच्या संसदेतही मोदी…मोदीच्या घोषणा
तेलअविव : इस्त्रालयच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलच्या संसदेतील (क्नेस्सेट) सभागृहाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारत–इस्रायल संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला. “भारत आता आणि भविष्यातही इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे,” असे ते म्हणाले. दरम्यान मोदींच्या भाषणानंतर इस्त्रालयचे संसदेतही मोदी…मोदीच्या घोषणा निनादल्या.
दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “भारत बराच काळापासून दहशतवाद सहन करत आहे,” आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य वाढवावे, असे आवाहन केले.
इस्रायलच्या संसदेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “या सन्माननीय सभागृहासमोर उभे राहणे माझ्यासाठी भाग्य आणि सन्मानाची बाब आहे. मी भारताचा पंतप्रधान आणि प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या संस्कृतीला संबोधित करत आहे. मी १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा, मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन इस्रायलमध्ये आलो आहे.”
या दौऱ्यात संरक्षण, कृषी, तंत्रज्ञान आणि दहशतवादविरोधी सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
फोटो ओळ
इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतान्याहू यांनी स्वागत केले. यावेळी सारा यांनी परिधान केलेला भगव्या रंगाचा वेष सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
