मुंबईतील फेरीवाल्यांना
क्युआर कोड प्रमाणपत्र
मुंबई : मुंबईतील रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेने आघाडी उघडली आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात फेरीवाल्यांसाठी नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता रस्त्यावर फक्त क्युआर कोड आधारीत प्रमाणपत्र असलेल्या अधिकृत फेरीवाल्यांनाच आपले दुकान थाटता येणार आहे.
महायुती सरकारच्या नव्या फेरीवाला धोरणानुसार, अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी क्युआर कोड आधारित प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. यापुढे मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच अनधिकृत आणि बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र होणार आहे.
यामुळे बेयकादेशीर रित्या फुटपाथ व्यापणाऱ्या फेरिवाल्यांना आळा बसणार आहे.
