राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुष्मिता देशमुख, तन्विर कोतवाल ठरले “सर्वोत्तम लिफ्टर”

मुंबई : महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व नागरिक सहाय्य केंद्र, वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद, वरिष्ठ, मास्टर्स, महिला गटाच्या निवड चाचणी २०२६ च्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ठाण्याची सुष्मिता देशमुख आणि सांगलीचा तन्विर कोतवाल हे सर्वोत्तम लिफ्टरचे मानकरी ठरले. स्पर्धेत राज्यातील १५ जिल्ह्यांमधून ३५० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये क्रीडा महर्षी मधुकर तळवलकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त, संजीवन भास्करन, अध्यक्ष, मरापॉअ, व्यायाम महर्षी पपी पाटील, संस्थापक पवनपुत्र व्यायाम शाळा, चेंबूर सुहास पाठारे, क्रिकेट प्रशिक्षक, गोपाळ कोळी, खोखो प्रशिक्षक, गजानन वाईरकर, संस्थापक आझाद हिंद सर्वोत्कृष्ट मंडळ, विजय परदेशी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मधुकर पाटकर, डॉ.अर्जुन मुरुडकर, सदानंद चिखले (निवृत्त एअर फोर्स अधिकारी) यांची उपस्थिती लाभली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भास्कर सावंत, नागरिक सहाय्य केंद्र, सूर्यकांत गर्दे, संजय माधव, अनंत चाळके, राजहंस मेहंदळे, जितेंद्र यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्पर्धेचा निकाल:

वरिष्ठ महिला गट- ४९ किलो-१) अमृता भगत- रायगड,२) देबुश्री सवानल-पुणे ३) सायली सन्नक-रत्नागिरी

५२ किलो-१) सुष्मिता देशमुख-ठाणे २) तनवी तापडिया- पुणे ३) वैष्णवी चव्हाण मुंबई, ५७ किलो-१) दीप्ती सावंत ठाणे २) संजना ठमके- ठाणे ३) धनश्री पासाळकर पुणे ६३ किलो-:१) सोनाल निवाळकर पुणे २)अनिशा बिर्ला मुं-उ ३)चैत्राली कुलकर्णी पुणे ६९ किलो- १) सारा मुकादम मुंबई उपनगर २) आरती आंबेरकर-सिंधुदुर्ग ३) संजीवनी तांडेल पालघर, ७६ किलो १) सेजल मोईकर पुणे २) युती धुमकेकर-अहिल्यानगर

३) मेरीन अपेन-ठाणे ८४ किलो १) संहीता मलिक-मुंबई उपनगर २) दीक्षा राऊत-ठाणे ३) स्वप्ना भास्कर-नाशिक ८४ किलोवरील : १) कॅरोलीन पेटसी पुणे २)प्रिया राव-मुंबई उपनगर ३)तन्वी सुर्वे -रत्नागिरी.

वरिष्ठ पुरुष गट -:५९ किलो १)यज्ञेश कावले मुंबई २)योगेश गुंड मुंबई ३)ग्लेन फर्नांडिस ठाणे ६६ किलो-१)गणेश शाहू मुंबई उपनगर २) रोहित देशमुख ठाणे ३)साहिल लांजेकर पुणे ७४ किलो १)तन्वीर कोतवाल सांगली २) तेजस काकडे -पुणे ३)हेमंत कांबळे-ठाणे ८३ किलो १)राजेश लांजेकर ठाणे २) केतन नेमाडे जळगाव ३)दीपक शाहू पालघर ९३ किलो १)जितेंद्र राणे, मुंबई उपनगर २) अॕग्नेल नाडर ठाणे ३) संतोष वाघमारे नवी मुंबई १०५ किलो १)अनिकेत कांबळे मुंबई उपनगर २)चैतन्य कोलापे-पुणे ३)डेव्हिड पोतराज ठाणे १२० किलो १)शिवम ठाकुर पुणे २)आदित्य घरत-नवी मुंबई ३)अभिषेक मूल्या-मुंबई १२० किलो वरील : १)सुनील जैन- ठाणे २)रोहित पवार-पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *