विमान कंपनीविरोधात एफआयआरसाठी रोहीत पवारांची पोलिसस्टेशनला धडक

हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याचीही मागणी

तपास जाणीवपुर्वक संथ गतीने होत असल्यीचा टिका

मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांसारक्या दिग्गज नेत्याचे विमान अपघातात मृत्यू होतो. अपघातातील प्राथमिक चौकशीत विमान कंपनीचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसत असूनही या विमान कंपनीविरोधात एफआयआर का दाखल करीत नाही असा सवाल करीत रोहीत पवार यांनी आज मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये धडक दिली.

दरम्या डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्सच्या ४ विमानांना उड्डाणास बंदी घालण्यात आलीय. या कंपनीला वाचवणाऱ्या केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणीही रोहीत पवार यांनी केली आहे.

डीजीसीए ने (नागरी उड्डाण प्राधिकरण) व्हीएसआर व्हेंचर्सला दिलेले सुरुवातीचे क्लीन चिट आणि त्यानंतरच्या विशेष सुरक्षा ऑडिटमधील निष्कर्षांमध्ये मोठी विसंगती असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

विधानभवनात माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, २८ जानेवारी २०२६ रोजी, अपघातानंतर लगेचच डीजीसीएने एक अहवाल जारी केला होता. या अहवालात व्हीएसआर व्हेंचर्सच्या लियरजेट विमानामध्ये कोणतीही लेव्हल एक त्रुटी आढळली नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याच दिवशी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनीही व्हीएसआर व्हेंचर्समध्ये सुरक्षाविषयक कोणतीही चिंता नसल्याचे म्हटले होते.

 

मात्र, अलीकडेच झालेल्या व्हीएसआर व्हेंचर्सच्या विशेष सुरक्षा ऑडिटमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये विमान उडण्यायोग्य आहे की नाही, हवाई सुरक्षा आणि उड्डाण कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटींचा समावेश आहे. जनतेच्या दबावामुळेच हा तपास योग्य दिशेने जात असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. या गंभीर विसंगतीमुळे, त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

 

दरम्यान आज आमदार रोहित पवार आमदार रोहित पवार मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस स्थानकात दाखल झाले. डीजीसीए आणि व्हीएसआर या विमान कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते पोलिस स्थानकात गेले. रोहित पवारांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात ते आक्रमक भूमिका घेताना दिसले. पोलिसांशी संवाद साधताना रोहित पवारांनी केवळ अर्ज स्वीकारण्याऐवजी थेट एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. हे केवळ एक निवेदन नाही तर एक तक्रार आहे, ज्यावर त्वरित एफआयआर दाखल व्हायला हवा. असे रोहीत पवार म्हणाले.

फोटो कॅप्शन

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन आमदार रोहीत पवार यांनी अमोल मिटकरी, इद्रिस नाईकवडी आणि संदिप क्षीरसागर यां आमदारांसह जाऊन व्हीएसआर व्हेंचर्स कंपनी विरोधात बीएनएस कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *