सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा
इंदिरानगर संघर्ष रहिवासी संघटनेची पोलिसांकडे मागणी
कल्याण: टिटवाळा पुर्व येथील इंदिरानगर स्मशानभूमी रस्ता विभागात सामाजिक कार्यकर्ते महेन्द्र शेजुळ हे गेले १५ वर्षांपासून राहणारे असून गेल्या ८ वर्षांपासून परिसरातील सामाजिक कामे जनतेची सेवा सर्वांशी मनमिळावू स्वभावामुळे त्यांची ओळख होती. मात्र २१ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेजूळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इंदिरानगर संघर्ष रहिवासी संघटनेने पोलिसांकडे केली आहे.
शेजूळ कामावरून घरी जात असताना अचानक अर्जुन शर्मा यांने आवाज दिला मागे वळून बघितले तितक्याच पाठीमागून त्यांचे आणखी दोन सहकारी यांनी धार-धार कोयत्याने वार करून जिवे मारण्यासाठीचा कट त्याचा अधिपासुनच प्लानिंग केला होता असे दिसून येते. महेंद्र जोरात ओरडल्या ने चाळीत राहणाऱ्यानी बचाव करण्यासाठी गेले असता त्यांच्या वर देखिल हल्ला करत तेथुन पळ काढला. यावेळी चाळीतील लोकांनी महेंद्र यांना रक्तस्राव चालू असलेल्या अवस्थेत उचलून रुग्णालयात दाखल केले असता त्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक असून पुढील उपचार सुरू आहेत.
हि घटना माहिती पडताच परिसरात हळहळ व्यक्त होत असुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी संघर्ष रहिवासी संघटना इंदिरानगर मार्फत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आले असून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
