३६ हजार कोटींच्या ठेवी

मुंबई महापालिका मोडणार!

 मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर आता भाजपा शासित महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेच्या एकूण ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये ठेवींपैकी ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपयांच्या ठेवी मोडणार आहेत. उर्वरीत ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला त्या तोडता येणार नाहीत.

पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ताबदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला होता. तसंच चित्र आता पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०९५२.५६ कोटी इतका असणार आहे. २०२५-२६ च्या तुलनेत यंदा ८.७७% नं वाढ यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. २०२५-२६ चा अर्थसंकल्प

७४४२७.४१ इतका अंदाजे अर्थसंकल्प होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ६५२५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२६-२७या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्र सादर करण्यात आलं. आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ठाकरेंच्या ठेवी महायुती मोडणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई महानगर पालिकेनं पूल बांधणीचं काम घेतलं हाती  

मुंबईत जवळपास एकूण १०१ पुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी २४ कामं पूर्ण झाली असून मार्च २०२६ पर्यत २३ कामे पूर्ण होणार आहेत. 2026-27 मध्ये ३१ कामे पूर्ण करण्यात येतील. २०२८-२९ मध्ये २३ पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *