नवी दिल्ली : भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इस्रायलमध्येही सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यात हा करार करण्यात आला आहे. या दौऱ्यात भारत आणि इस्रायलदरम्यान अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले.

हा करार भारताच्या डिजिटल व्यवहार क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार, भारतीय नागरिक आणि व्यापाऱ्यांना आता इस्रायलमध्येही UPI च्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करता येणार आहेत. त्यामुळे भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी बळ मिळणार आहे.

UPI इस्रायलमध्ये कार्यान्वित झाल्यामुळे व्यवसायशिक्षण आणि पर्यटनासाठी इस्रायलला वारंवार जाणाऱ्या भारतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापुढे त्यांना दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन, महागड्या कार्ड शुल्कांवर किंवा रोख रकमेवर अवलंबून राहावे लागणार नाही. केवळ मोबाईलच्या माध्यमातून काही सेकंदांत सुरक्षित आणि सोपे पेमेंट करणे शक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *