पुण्यात ALIGN या संरचित रेजोनन्स उपक्रमाचा शुभारंभ
पुणे : सजगता -आधारित रेजोनन्स उपक्रम ALIGN चा औपचारिक शुभारंभ रविवारी बाणेर येथील Fitcue Fitness Studio येथे करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागींसाठी ध्वनी -आधारित, संरचित आणि सखोल अनुभव सादर करण्यात आला, ज्याचा उद्देश मज्जासंस्थेचे संतुलन, भावनिक स्थैर्य आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढवणे हा आहे. प्रिथा देशपांडे आणि डॉ. नेहा साटम यांनी अमोल चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची स्थापना केली आहे. ALIGN ची संकल्पना अशी आहे की ‘अलाइनमेंट’ ही अशी अवस्था आहे, ज्याकडे व्यक्ती जाणीवपूर्वक परत जाऊ शकते. चेतना-विषयक पद्धती आणि मोजता येणाऱ्या आरोग्य-जागरूकतेचा संगम घडवून संरचित आणि सर्वांसाठी उपलब्ध असे व्यासपीठ निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मार्गदर्शित रेजोनन्स-आधारित तसेच इतर उपचारात्मक अनुभवांच्या माध्यमातून व्यक्तींमध्ये संतुलित उपस्थिती, भावनिक समतोल आणि सजग जीवनशैली विकसित करण्याचे ‘ALIGN’चे ध्येय आहे. २०३० पर्यंत २३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत सकारात्मक प्रभाव पोहोचविण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात छोटेखानी समारंभाने झाली. त्यानंतर उपक्रमाच्या कार्यपद्धती आणि तज्ज्ञ टीमची ओळख करून देण्यात आली. विशेष बाब म्हणजे सत्रापूर्वी आणि सत्रानंतर सहभागींचे हृदयगती व ऑक्सिजन पातळी यांसारखे मूलभूत आरोग्य निर्देशांक नोंदवण्यात आले. अनुभवात्मक साधना आणि मोजमापयोग्य निरीक्षण यांचा संगम साधणारी ही रचनाबद्ध कार्यपद्धती ‘ALIGN’ची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली आहे.
