बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या १६व्या उलवे शाखेचे उद्घाटन
३०० कोटी संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल -आनंद गावडे
अनिल ठाणेकर
नवी मुंबई, उलवे विभागात बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या १६ व्या शाखाकार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते २२ फेब्रुवारीला करण्यात आले.संस्था ३०० कोटी संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल करीत असल्याचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे यांनी स्पष्ट केले.अशी माहिती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली.
उलवे विभागात शाखा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी साई प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक  देवदासजी डोंगरे, ट्रान्सपोर्ट आणि डॉक वर्कर्स युनियन मुंबईचे सचिव  बबनराव मेटे, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे, उपाध्यक्ष  भगवान शेटे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुरेश गावडे, बाबुराव डोंगरे, वसंत गावडे,  दामाजी डोंगरे, रमेश धुमाळ, शरद डोंगरे, जगन्नाथ दाते,  दैवत डोंगरे,  बाळासाहेब डोंगरे, निता गावडे, सुनिता डोंगरे, खंडू आहेर, सरव्यवस्थापक  संजय घोगरे तसेच संस्थेचे स्थानिक सल्लागार मंडळ, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, हितचिंतक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.साईप्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सन्माननीय  देवदासजी डोंगरे व ट्रान्सपोर्ट आणि डॉक वर्कर्स युनियन मुंबईचे सचिव सन्माननीय बबनराव मेटे यांनी संस्थेला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था सर्वसामान्य माणसाला आधार देणारी पतसंस्था असून संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन करून वाटचाल केली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. संस्थेच्या विविध आर्थिक योजनांचा लाभ सभासदांना होत असून सामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था महत्त्वपूर्ण राहील,  असे. प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्यामध्ये बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था आघाडीवर असून संस्थेच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल संस्थेला सहकार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयासह एकूण १२ शाखा स्वमालकीच्या असून लवकरच संस्था उर्वरित शाखा स्वमालकीच्या करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. संस्थेचे २८,००० सभासद असून संस्था रु. ३०० कोटी संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल करीत असल्याचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचा व संस्थेच्या सल्लागार कार्यकर्त्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक दामाजी डोंगरे करत असताना त्यांनी संस्थेचा २६ वर्षांचा इतिहास विशद केला व सदर उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक संजयजी घोगरे यांनी केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष भगवान शेटे यांनी उपस्थित मान्यवर व सभासद यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *