७२वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा, बडोदरा, गुजरात – २०२६.
महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल
वडोदरा:- महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उपउपांत्य फेरी गाठली. उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राची गाठ हिमाचल प्रदेश संघाशी होईल. गुजरात, वडोदरा येथील सागा बंदिस्त क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रने पॉन्डेचारीचा प्रतिकार ६९-२१ असा सहज संपुष्टात आणला. आक्रमकतेवर भर देत महाराष्ट्राने पूर्वार्धात ३लोण देत ३५-०९ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम राखत आणखी २लोण देत गुणांचे अर्धशतक पार करीत ४८ गुणांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. आदित्य शिंदे, असलम इनामदार यांच्या तुफानी चढाया त्यांना संकेत सावंत, दादासो पुजारी, जयेश महाजन यांची मिळालेली बचावाची भक्कम साथ यामुळेच हा मोठा विजय मिळवता आला. या अगोदर रात्री उशीरा झालेल्या साखळीतील शेवटच्या लढतीत  महाराष्ट्राने त्रिपुराचा ३३-११ असा पराभूत केला. महाराष्ट्र गटात अपराजित राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *